Zarif Baba Murder Case : सुफी धर्मगुरूंचा मृतदेह मुंबईला | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Zarif Chisti Baba murder case latest news

Zarif Baba Murder Case : सुफी धर्मगुरूंचा मृतदेह मुंबईला

नाशिक : निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरू जरीफबाबा यांचा दफनविधीचा प्रश्‍न आता मिटणार असून, त्यांचा दफनविधी हा त्यांच्या मूळ देश अफगाणिस्तानातच होणार आहे. त्यादृष्टीने त्यांचा मृतदेह (Dead Body) हा नाशिक येथून शनिवारी (ता..२३) मुंबईला नेला जाणार आहे.

यास पोलिस प्रशासनाकडून देखील दुजोरा देण्यात आला आहे. तिथे खासगी रुग्णालयात त्यांचा मृतदेह ठेवला जाईल. या प्रक्रियेमुळे सुफी धर्मगुरू यांच्या दफनविधीचा मार्ग आता मोकळा होत आहे. (Zarif Baba Murder Case Dead body of Sufi priest sent to Mumbai nashik Latest marathi news)

हेही वाचा: ‘Z Plus’ नाकारून एकनाथ शिंदेंना मारण्याचा विचार होता काय? : सुहास कांदें

निर्वासित अफगाणी सुफी धर्मगुरू जरीफबाबा यांचा गेल्या ५ जुलैला रात्री येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसीत गोळी झाडून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आत्तापर्यंत चौघांना अटक केली आहे.

जरीफबाबांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी यांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेत तपासाची माहिती जाणून घेतली होती. दरम्यान, त्यांची पत्नी या मुंबईत त्यांच्या नातेवाइकांकडे वास्तव्यास आहे. पोलिसांकडून देखील पुढील तपास सुरू आहे.

सेवेकऱ्यांची चौकशी केली जात आहे. तोपर्यंत जरीफबाबा यांच्या मृतदेह हा नाशिक येथे ठेवण्यात आला होता. मृतदेह हा अफगाणिस्तान येथे नेण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दूतावास आणि इतर प्रक्रिया केल्या जात आहेत.

मात्र त्यास वेळ लागत होता. मात्र शनिवारी (ता. २३) जरीफबाबा यांचा मृतदेह हा मुंबईला नेला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या मूळ गावीच त्यांचा दफनविधी होण्याची दृष्टीने कार्यवाही होत आहे.

हेही वाचा: निवडणुकीसाठी 26 जुलैला नव्याने आरक्षण सोडत

Web Title: Zarif Baba Murder Case Dead Body Of Sufi Priest Sent To Mumbai Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..