Nashik News: स्मार्ट सिटीत झेब्रापट्टे दिसेनासे! वाहतूक शाखेच्या पाठपुराव्याला मनपा देईना दाद

शहरातील बहुतांशी चौकांमध्ये झेब्रा पट्टे शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे चौक ओलांडून वाहनचालक पुढे थांबतात.
Zebra stripes not seen in smart city road NMC not appreciating follow up of transport department Nashik
Zebra stripes not seen in smart city road NMC not appreciating follow up of transport department Nashikesakal

नाशिक : शहरातील बहुतांशी चौकांमध्ये झेब्रा पट्टे शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे चौक ओलांडून वाहनचालक पुढे थांबतात. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होते. मात्र झेब्रा पट्टेच नसल्याने वाहनचालक आणि पोलिसांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतात.

यासंदर्भात शहर वाहतूक शाखेकडून नाशिक महापालिकेला शहरातील चौकांमध्ये झेब्रा पट्टे मारण्यासंदर्भात वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

परंतु महापालिकेकडून कोणतीही दाद मिळत नसून त्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. (Zebra stripes not seen in smart city road NMC not appreciating follow up of transport department Nashik News)

महामार्गावरील चौक व सिग्नल्स वगळता राज्य मार्ग व उपनगरीय मार्गांवरील सिग्नल्स व चौकांमध्ये झेब्रा पट्टे दिसेनासे झालेले आहेत.
महामार्गावरील चौक व सिग्नल्स वगळता राज्य मार्ग व उपनगरीय मार्गांवरील सिग्नल्स व चौकांमध्ये झेब्रा पट्टे दिसेनासे झालेले आहेत. esakal

दोन वा त्यापेक्षा जास्त रस्ते  एका चौकात येत असतील तर त्याठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे आखणे आवश्‍यक आहे. चौकांमधील सिग्नल यंत्रणा यासह झेब्रा क्रॉसिंग पट्टे, झिकझॅक क्रॉसिंग पट्टे व वाहतुकीसंदर्भात रस्त्यावरील उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

तर, शहर वाहतूक पोलिसांवर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी आहे. असे असतानाही महापालिकेकडून वाहतुकीसंदर्भातील त्यांच्या जबाबदारीचे पालन होत नसल्याने शहरातील बहुतांशी चौकांमध्ये आजमितीस झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे दिसेनासे झाले आहेत.

विशेषत: नाशिक शहरातून मुंबई-आग्रा महामार्गासह नाशिक - पुणे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक - त्र्यंबकेश्वर, नाशिक - गिरणारे, नाशिक - पेठ, नाशिक-सापुतारा हे राष्ट्रीय व राज्यस्तरीय मार्ग आहेत.  

याशिवाय शहरांतर्गत उपनगरीय रस्ते आहे. नाशिक शहर हददीमध्ये ५३ सिग्नल्स आहेत. यातील महामार्गावरील चौक व सिग्नल्स वगळता राज्य मार्ग व उपनगरीय मार्गांवरील सिग्नल्स व चौकांमध्ये झेब्रा पट्टे दिसेनासे झालेले आहेत.

शहरातील प्रमुख चौकांमध्येही झेब्रा पट्टे नसल्याने त्याठिकाणी वाहनचालक बेशिस्तपणे सिग्नल ओलांडून थांबतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कारवाई करताना पोलिसांशी वाहनचालक हुज्जत घालतात. मात्र झेब्रा पट्टे नसल्याने पोलिसांनाही माघार घ्यावी लागते.

Zebra stripes not seen in smart city road NMC not appreciating follow up of transport department Nashik
Nashik Truck Drivers Strike: अखेर तोडगा निघाला! नाशिकमध्ये टँकर चालकांचा संप मागे; इंधन पुरवठा होणार सुरळीत..

स्मार्ट सिटीसाठी महत्त्वाचे

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना, स्मार्ट रोडवरील स्मार्ट सिग्नलवरच पांढरे पट्टे दिसेनासे झालेले आहेत. याबाबत वाहतूक शाखेकडून नाशिक महापालिकेला चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टयांसह साईड पट्टी मारण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

परंतु, अद्यापही महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने एकप्रकारे उदासिनताच दिसून येते आहे.

पादचाऱ्यांची कसरत

चौक वा सिग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे हे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असतात. परंतु चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टेच राहिलेले नाहीत.

त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा वाहने खुपच पुढे येऊन थांबतात. त्यावेळी पादचाऱ्यांनाही मार्गक्रमण करताना वादावादीला सामोरे जावे लागते.

"बहुतांशी सिग्नल्स व चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत. यामुळे वाहतूक नियमन करण्यासही अडचण येत असते. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे."

- डॉ. सचिन बारी, सहायक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा

Zebra stripes not seen in smart city road NMC not appreciating follow up of transport department Nashik
Nashik Police: थर्टी-फस्टचा ‘फिव्हर’ पोलिसांनी उतरविला! 336 बेशिस्तांवर कारवाई; हातगाड्या बंद केल्याचा परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com