नाशिक: जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिमा मित्तल यांच्या अपरोक्ष केलेले ‘सेस’ निधीचे नियोजन अखेर रद्द करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. त्यामुळे या नियोजनावर पूर्णत: पाणी फिरले असून, आता चुकीच्या नियोजनासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.