नाशिक- जिल्हा परिषदेच्या ‘सेस’ निधीच्या वापरात नियमानुसार न होता परस्पर नियोजन करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तत्काळ हस्तक्षेप करत सर्व संबंधित कामांना थांबवले आहे. पुढील दोन दिवसांत फेरनियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली असून, चुकीची कामे रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी विभागप्रमुखांना दिला आहे.