नाशिक- तब्बल साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणरचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता. १४) अखेर प्रसिद्ध करण्यात आला. नव्या आराखड्यानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या आता ७४ झाली असून, गणांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. विशेषतः मालेगाव, चांदवड आणि सुरगाणा या तालुक्यांत प्रत्येकी एक गट वाढला आहे, तर निफाड तालुक्यात दोन गट कमी करण्यात आले आहेत.