Nashik Zilla Parishad Election
Sakal
नाशिक: तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत सोमवारी (ता. १३) जाहीर झाली. १५ तालुक्यांतील एकूण ७४ गटांमध्ये ३७ जागा या महिलांसाठी राखीव आहेत.
फिरत्या आरक्षणाला ‘ब्रेक’ लागल्याने नव्याने निघालेल्या सोडतीत अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले; तर जागा आरक्षित निघण्याची शक्यता असलेल्या बहुतांश इच्छुकांना या बदलत्या समीकरणांनी ‘लॉटरी’ही लागल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या आधीच आरक्षणानिमित्त ‘निवडणुकीचे फटाके’ फुटल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.