नाशिक: जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदोन्नतीला सोमवारी (ता. १८) मुहूर्त लाभणार होता. मात्र, अधिकाऱ्यांमधील अंतर्गत तक्रारींमुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली. पुढील आठवड्यात नवी प्रक्रिया राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी दिले आहेत.