Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गणांच्या चक्राकार (आळीपाळीने) पद्धतीच्या आरक्षणाला ‘ब्रेक’ लागल्यानंतर सोमवारी (ता. १३) नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत सकाळी अकराला शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात निघेल. पंचायत समित्यांचे आरक्षण संबंधित तहसीलदार काढतील.