Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: चक्राकार पद्धतीने आरक्षणाचा मार्ग मोकळा होताच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या यांच्या गट व गणांचा आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला काढण्यात येईल. जिल्हा परिषद गटांची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती गणांची सोडत संबंधित तहसीलदार काढणार आहेत.