Nashik ZP News : जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांची सेल्फी हजेरीकडे पाठ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या सेल्फी हजेरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पाठ फिरविली जात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांना सेल्फी हजेरी बंधनकारक केली आहे.
Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या सेल्फी हजेरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पाठ फिरविली जात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांना सेल्फी हजेरी बंधनकारक केली आहे.

जिल्हाभरातील दोन हजार ६५४ कर्मचाऱ्यांची सेल्फी हजेरीसाठी अॅपवर नोंदणी झाली असून, केवळ ४७५ कर्मचारी हजेरी नोंदवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सरासरी हजेरी केवळ १८ ते २० टक्के आहे.(ZP Back to Selfie Attendance of Health Workers nashik news )

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहात नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. बायोमेट्रिक हजेरी मशिन असताना कर्मचारी हजर नसल्याच्या तक्रारी होत्या. यात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या भेटीदरम्यानही कर्मचारी गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले होते.

अंजनेरी, चांदोरी येथील घटनेनंतर मित्तल यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची थेट सेल्फीद्वारे हजेरी घेण्याचा निर्णय घेतला. यात हजेरीसह फोटो अपडेशन, लाइव्ह लोकेशन आणि जिओ टॅगिंग यंत्रणेचा वापर करत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले. हे अॅप आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये टाकण्यात आले.

Nashik ZP News
Nashik ZP News : 3 महिन्यांत 187 कोटी खर्चाचे जिल्हा परिषदेसमोर आव्हान

जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची यात नोंद करण्यात आली. सेल्फीद्वारे १ सप्टेंबर २०२३ पासून हजेरी सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सुरवातीला काही आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर हजेरी सुरू झाली. दोन महिन्यांतील प्रायोगिक तत्त्वावरील या हजेरीतील उणिवा दूर करून नोव्हेंबरपासून सेल्फी हजेरीला प्रारंभ केला खरा.

मात्र, कर्मचाऱ्यांकडून या हजेरीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे रोजच्या मोबाईल अॅपद्वारे होणाऱ्या हजेरीवरून लक्षात येत आहे. यात काही दिवसांपासून ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांकडून नित्यनियमाने हजेरी लावली जात असल्याचे सांगितले जात आहे. मोबाईल अॅपवरील सेल्फी हजेरी बंधनकारक असल्याचे पत्र आरोग्य विभागाने आतापर्यंत दोन ते तीनवेळा काढले.

त्यानंतर याबाबत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसादेखील बजाविल्या गेल्या आहेत. असे असतानाही कर्मचाऱ्यांकडून हजेरी होत नसल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारीला ४७०, २ जानेवारीला ४७५ कर्मचाऱ्यांनी अॅपवर सेल्फी हजेरी दिल्याची नोंद आहे. दरम्यान, विभागातील अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांनी सेल्फी हजेरी करावी, यासाठी वारंवार सूचना केल्या जात आहेत. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना, पत्रही दिले आहे.

Nashik ZP News
Nashik ZP News : जि. प. च्या सर्व संवर्ग सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com