नस्तनपूर - अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचा मेळावा संपन्न

nandgaon
nandgaon

नांदगाव - युवक जोडो अभियानातंर्गत युवा उद्योजक तयार करणे, नौकरी विषयक मार्गदर्शन, वधु वर सूचक नोंदणी इ. विषयांवर नांदगाव तालुक्यातील युवकांचा भव्य मेळावा श्री क्षेत्र नस्तनपूर येथे घेण्यात आला. 

यावेळी माजी आमदार अॅड अनिल आहेर यांनी तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहत असतांना शेतीवर अवलंबून न राहता व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच नाशिकचे युवा उद्योजक सुदामराव पवार यांनी यशस्वी उद्योजक कसे बनावे यावर मार्गदर्शन केले. तर संदीप शितोळे यांनी नौकरी विषयक मार्गदर्शन केले व अप्पासाहेब गाडे यांनी वधू वर सूचक नोंदणी बाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यास तालुक्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विलास जाधव उपाध्यक्ष निलेश मोरे, नांदगाव तालुका संपर्कप्रमुख गणेश शिंदे, आदींची भाषणे झाली कार्यक्रमास प्रशांत आवटे,हेमंत मोरे, डॉ.गौरव शितोळे,कुणाल देशमुख, सचिन पवार, अनिल घाडगे, दादा पगार, विनोद पवार, अमोल गरुड, इत्यादिसह मोठ्या संख्येने तरूण उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी केले व संयोजन तालुका संपर्क प्रमुख गणेश शिंदे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com