बैलगाडीत दुचाकीने सिलेंडरची अंत्ययात्रा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

Nationalist Congress Agitation Against Increasing Rates Of Fuel
Nationalist Congress Agitation Against Increasing Rates Of Fuel

कोपरगाव : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बैलगाडीत दुचाकी ठेवून, काहींनी दुचाकी ढकलत, तसेच गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. 

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून मोर्चा सुरू झाला. तहसील कार्यालयाच्या आवारात त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी 'राष्ट्रवादी'चे कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले, "केंद्र सरकारने निव्वळ पोकळ आश्वासने देऊन सर्वसामान्य नागरिकांची अवहेलना केली आहे. महागाईच्या खाईत लोटल्याने जनता होरपळून निघत आहे. मोदी सरकारने क्रूड ऑइलमध्ये केवळ नफेखोरीचे एक कलमी धोरण राबविले असून, त्यातून भाजपला तब्बल 12 लाख कोटी रुपये मिळाले.'' 

दुष्काळाच्या नावाखाली राज्य सरकारने पेट्रोलवर दोन रुपये सेस, तर दारूची दुकाने बंद झाल्याने तीन रुपये सेस लावला. त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. कुटुंबाचे आर्थिक गणित कोसळले आहे, असे ते म्हणाले. या वेळी 'राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेविका प्रतिभा शिलेदार आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com