जैताणेच्या उपसरपंचपदी नवल खैरनार बिनविरोध!

जैताणेच्या उपसरपंचपदी नवल खैरनार बिनविरोध
जैताणेच्या उपसरपंचपदी नवल खैरनार बिनविरोध

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. सकाळी दहाला ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ईश्वर न्याहळदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. सरपंच ईश्वर न्याहळदे सूचक, तर माजी सरपंच संजय खैरनार अनुमोदक होते.

विकास, ग्रामविकास, समताविकास या तिन्ही पॅनलने गावात सलग तिसऱ्यांदा बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा गावातील 'माळी-धनगर' व अन्य समाजाच्या एकजुटीचा संदेश दिला. ठरल्याप्रमाणे मुदत संपल्याने उपसरपंच आबा भलकारे यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. दिलेल्या मुदतीत नवल खैरनार यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

नवल खैरनार यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच समर्थक, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चौकात फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. त्यानंतर कार्यकर्ते व समर्थकांनी नवल खैरनार यांचा जंगी सत्कार केला. निवड प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी सरपंच ईश्वर न्याहळदे, माजी सरपंच संजय खैरनार, मावळते उपसरपंच आबा भलकारे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड आदींसह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

विशेष सभेस नवनिर्वाचित उपसरपंच नवल खैरनार, सरपंच ईश्वर न्याहळदे, माजी सरपंच संजय खैरनार, मावळते उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पगारे, शानाभाऊ बच्छाव, दादा भिल, सुरेखाबाई युवराज बोरसे, पुष्पाबाई प्रकाश गवळे, प्रमिलाबाई दौलत जाधव, आशाबाई सुरेश सोनवणे, छाया प्रमोद कोठावदे व सुरेखा आबा भिल आदी तेरा सदस्य उपस्थित होते.

उपसरपंचपदाचे दुसरे दावेदार तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश देवरे, मनीषा बागुल, इंदूबाई खलाणे आदी मात्र अनुपस्थित होते. ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदाची 'पहिली टर्म' नवल खैरनार यांना देण्यात आली. तर येत्या दोन वर्षात माळी समाजाच्या इतर सदस्यांनाही संधी दिली जाणार आहे. बिनविरोध निवडीसाठी मार्गदर्शक, गटनेते व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com