Nandurbar Crime News : नवापूर वन विभागाने पकडला अवैध लाकूडसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Timber seized by Forest Department and Forest Department personnel

Nandurbar Crime News : नवापूर वन विभागाने पकडला अवैध लाकूडसाठा

नवापूर (जि. नंदुरबार) : वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २४) दोन ठिकाणी अवैध लाकूडसाठा पकडला. मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई केली. यात तालुक्यातील डोकारे येथून दीड लाख, तर हुकमाफळी येथील शेतात मातीत लपवून ठेवलेले दोन ते अडीच लाखांचे सागवानी लाकूड पकडले. (Navapur forest department caught illegal wood storage nandurbar crime news)

नवापूर व चिंचपाडा वन विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून तालुक्यातील डोकारे गावात व रस्त्यावर गस्त घालत असताना डोकारे गावाला लागून शेतात बेवारस हळदू नग २३ मिळून आले. या मालाची किंमत बाजारभावानुसार अंदाजे दीड लाख असून हा माल जप्त करून नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केला.

नवापूर व चिंचपाडा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हुकमाफळी गावालगतच्या महसूल भागातील नाल्यात जाऊन पाहणी केली असता नाल्यात नवीन पीकपेरा केलेल्या ठिकाणी खोदून पाहिले असता मातीत सागवानी लाकडे लपविलेली दिसली. जेसीबीच्या सहाय्याने शेतात पुरलेली सागवानी लाकडे काढलीय. ट्रॅक्टरमध्ये भरून नवापूर येथील वन विभागाच्या शासकीय विक्री आगारात जमा केली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

कारवाईत वनपाल संजय बडगुजर, वनरक्षक रामदास पावरा, सतीश पदमर, आशुतोष पावरा, ईलान गावित, कविता गावित, वाहनचालक बाळा गावित, रवी गावित, सुनील वसावे, सहाय्यक वन संरक्षण परिवीक्षाधीन गणेश मिसाळ, नवापूर व चिंचपाडा प्रादेशिक वाहनचालक विभांडिक यांनी सहभाग घेतला.