चालकाच्या डुलकीने गरिबरथ धडकला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

नवापूर : गरिबरथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासगी प्रवासी बसच्या चालकाची डुलकीने चरणमाळ (ता. नवापूर ) घाटात लक्झरी बस संरक्षक भिंतीवर धडकून एकाचा मृत्यू तर सोळा प्रवाशी जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बसचालक दारूच्या नशेत संगीत ऐकून बस चालवत होतो असेही सांगितले जाते. दुसरीकडे अपघाताची संधी साधत बसमधून प्रवाशांची दागिन्याने भरलेली बॅग लंपास करण्यात आली. 

नवापूर पोलिस ठाण्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरत येथील गरीबरथ खासगी ट्रॅव्हल बस (जी.जे १४ एक्स २२५०) धुळ्याहून लग्नकार्य करून सुरत येथे जात असताना चरणमाळ घाटातील तीव्र उतारावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या समोरील सुरक्षा भिंतीला जोरदार आदळली. या लक्झरीमधील चार बालकांसह १६ प्रवासी जखमी झाले. सहचालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातात लक्झरीचा समोरचा भाग चेपला गेला आहे. चालकाने घटनास्थळाहून रात्रीच पळ काढला. जखमींना भाजीपाल्याच्या ट्रक-जीपने सुरत येथील नवीन सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व प्रवाशी सुरत येथील उनपाट्याचे रहिवासी आहे. सहचालक शाहिद नजरी शाह (वय २४ रा.उन पाट्या सुरत गुजरात) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या खिशातून २२ हजार रुपये पोलिसांना मिळवून आले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसचालक दारूच्या नशेत मोठ्या आवाजाने संगीत ऐकत बस चालवत होता. दरम्यान बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा दावा बसमालक मुसा शाह यांनी करीत उडवाउडवीची उत्तरे दिली. 

लाखांची दागिन्यांची बॅग चोरीला 
बसमधील जखमी प्रवासी कुर्बान गुलाब शहा (२९ रा. ऊनपाटीया, सुरत) धुळे येथे पुतणीच्या लग्नासाठी कुटुंबातील १६ सदस्यासह गेले होती. अपघातानंतर त्यांच्याजवळील एक लाखांचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग चोरीला गेली अशी माहिती त्यांनी सुरत येथील पत्रकारांना दिली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navapur marathi news travels accident charanamal ghat