Nandurbar News : नवापूर पोलिसांनी पकडला गॅस सिलिंडरचा साठा

Navapur police seized stock of illegal gas cylinders nandurbar news
Navapur police seized stock of illegal gas cylinders nandurbar newsesakal

नवापूर (जि. नंदुरबार) : शहराच्या मध्यवर्ती भागात भरवस्तीत नागरिकारांचा जीव धोक्यात टाकून गॅस वाहनात भरण्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना शहरातील सरदार चौकातील एका घरात उघडकीस आली.

वाहनात गॅस भरण्यासाठी ठेवलेले ४० घरगुती गॅस सिलिंडर व गॅस भरण्याचे साधन पोलिसांनी जप्त केले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. (Navapur police seized stock of illegal gas cylinders nandurbar news)

नवापूर शहरातील सरदार चौकातील एका घरात नवापूर पोलिसांनी छापा टाकला असता घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर बेकायदा आढळले. सोबतच वाहनात गॅस भरण्यासाठीचे युनिट, दोन मोटारी, एक वजनकाटा, आधुनिक साहित्य पोलिसांना मिळून आले. या संदर्भात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने अनेक वाहनचालक कमी दरात घरगुती गॅस व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करून वाहनात धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने २८ मार्चला सायंकाळी सातला ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Navapur police seized stock of illegal gas cylinders nandurbar news
Dhule Crime News : कुंभारटेकवर दंगलीत चाकूने वार; सहा जखमी

वाहनात अवैधरीत्या गॅस भरण्यासाठी घरातील विविध कंपन्यांचे चाळीस घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. सहिद ऊर्फ लल्ला काथावाला याच्यावर नवापूर पोलिसांनी कारवाई केली. संबंधित व्यक्ती पोलिस आल्याने घटनास्थळावरून फरारी झाली असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Navapur police seized stock of illegal gas cylinders nandurbar news
Market Committee Election : नव्या नियमांनी इच्छुकांच्या नाकीनऊ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com