Dhule Crime News : लुटारू टोळीचा LCBकडून पर्दाफाश

Crime News
Crime Newsesakal
Updated on

धुळे : दुचाकीस्वाराला मारहाण करत त्याच्याकडील २४ लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. रोकड लुटणारे मोहाडी उपनगर येथील असल्याचे समोर आले. त्यांच्या अटकेसाठी परतूर (जि. जालना) येथे पथक गेले होते मात्र छाप्यादरम्यान संशयित फरारी झाले. त्यांचा आश्रयदाता मात्र पथकाच्या जाळ्यात अडकला.

परेशकुमार पुरुषोत्तमभाई पटेल १२ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या स्कूटी (एमएच १८, एयू ६५०३)ने शहरातील ऐंशीफुटी रोडवरील माधव कॉलनीतून घरी जात असताना चौघा लुटारूंनी त्यांना अडवत चेहऱ्यावर मिरचीपूड फेकून मारहाण केली. तसेच स्कूटीच्या डिकीतील २३ लाख ५७ हजार ४०० रुपयांची रोकड व स्कूटीदेखील चोरून नेली. या प्रकरणी आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (NCB Busts a Gang of Robbers Dhule Crime News)

Crime News
Dnyandeep Gurukul Ashram Case : आश्रम सोडून गेलेल्या मुलींचीही चौकशी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना मोहाडी उपनगर येथील जगपालसिंग अजयसिंग भादा व त्याचा भाऊ राजपालसिंग भादा यांनी त्यांच्या दोन साथीदारांसह ही लूट केल्याची माहिती मिळाली. लुटारू टोळी जसपालसिंग हरिसिंग जुनी (रा. परतूर, जि. जालना) याच्याकडे आश्रयाला गेली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबरला परतूर येथे जसपालसिंगच्या घरावर छापा टाकला. दरम्यान, जसपालसिंगने संशयितांना पळवून लावले. मात्र, स्वत: पथकाच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने लुटारूंना आश्रय दिल्याचे कबूल केले. तसेच त्या चौघांनी लूट केल्याचेही त्याने मान्य केले.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

Crime News
Nashik Crime News : शहरात 2 ठिकाणी घरफोड्या; साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

जसपालसिंगला पुढील कारवाईसाठी आझादनगर पोलिस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, प्रकाश पाटील, संजय पाटील, दिलीप खोंडे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप, उमेश पवार, पंकज खैरमोडे, रविकिरण राठोड, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, किशोर पाटील, सुनील पाटील, अमोल जाधव, सागर शिर्के, तुषार पारधी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Crime News
Ambad Kardile Case : मुंबईतून फॉरेन्सिकचे तज्ज्ञ पथक पाचारण; तपास काही लागेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com