‘राष्ट्रवादी’चे विकासकाम भाजपकडून ‘हायजॅक’!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

धुळे - महापालिका क्षेत्रात वडजाई रोड परिसरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले विकासकाम भाजपने थेट ‘हायजॅक’ केले. ‘राष्ट्रवादी’चे नेते राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते उद्‌घाटनाचे नियोजन असताना भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन उरकण्यात आले. विकास कामासाठी पुढाकार घेणारे ‘राष्ट्रवादी’चे माजी उपमहापौर फारूक शाह यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याने असे नाट्य रंगले. 

माजी उपमहापौर शाह यांनी वडजाई रोड परिसरात महापालिकेच्या माध्यमातून ओटा साकारला आहे. त्या परिसरातील नागरिकांना बैठक, लहान कार्यक्रम घेण्यासाठी ओट्याचा उपयोग होईल. या कामाचे श्री. कदमबांडे यांच्या हस्ते उद्‌घाटनाचे नियोजन होते. त्यांचे व कामाची संकल्पना मांडणारे माजी उपमहापौर शाह यांच्या नावाचा आकर्षक नीलफलकही ओट्यालगत भिंतीवर लावण्यात आला. त्याचे सायंकाळी मात्र भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यामुळे परिसरात आश्‍चर्य व्यक्त झाले. भाजपचे माजी शहराध्यक्ष हिरामण गवळी, शाह समर्थक उपस्थित होते. 

माजी उपमहापौर शाह, स्थायी समितीचे माजी सभापती सोनल शिंदे यांच्यासह काही पक्षातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ किंवा ३० एप्रिलला धुळे दौरा आहे. तो निश्‍चीत झाल्यास संबंधिताचा प्रवेश सोहळा होण्याचीही शक्‍यता असेल. तत्पूर्वीच, शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन केल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: ncp development work hijack by bjp