Vidhan Sabha 2019 : 'मोदी, शहा येवल्यात पैठण्या विणायला येत आहेत का?'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

मुख्यमंत्री आखाड्यात उतरल्याची भाषा करतात. मात्र गडी (मुख्यमंत्री) कोणत्याचं अंगाने पैलवान वाटत नाही. आखाड्यात पैलवान दिसत नाही.

नाशिक : सत्ताधारी पक्षांकडून राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिला नसल्याचे सतत बोलले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ राज्यात येवल्याला पैठण्या विणायला येत आहेत का असा प्रश्न केला आहे.

फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवारच होते : शिवसेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक सभेत विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यात विरोधकच शिल्लक नाहीत, लढायचे कोणाशी हेच कळत नाही, पैलवान लढायला तयार आहे, पण समोर स्पर्धकच नाही, अशी टीका सतत होत आहे. या टीकेला नाशिक दौऱ्यावर असताना अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मावळात शरद पवार म्हणाले, मंत्रीजी दूसरा कुछ काम मिलता है तो देखलो

कोल्हे म्हणाले, की मुख्यमंत्री आखाड्यात उतरल्याची भाषा करतात. मात्र गडी (मुख्यमंत्री) कोणत्याचं अंगाने पैलवान वाटत नाही. आखाड्यात पैलवान दिसत नाही. मोदी, शहा, योगी आदित्यनाथ राज्यात काय येवल्याला पैठण्या विणायला येणार आहेत का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Amol Kolhe targets CM Devendra Fadnavis in Nashik