'शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी गट-तट विसरा'

सिन्नर फाटा - राष्ट्रवादी काँग्रेस युवक मेळाव्यात शनिवारी बोलताना बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार. शेजारी माजी खासदार देवीदास पिंगळे, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड
सिन्नर फाटा - राष्ट्रवादी काँग्रेस युवक मेळाव्यात शनिवारी बोलताना बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार. शेजारी माजी खासदार देवीदास पिंगळे, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड

नाशिक रोड - भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. प्रकल्प होत नाहीत. विकासकामे झालेली नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळत नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले. हे सर्व बदलण्यासाठी आणि शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी गट-तट विसरून विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा.

पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य व बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांनी येथे शनिवारी (ता. २३) केले. 

नाशिक रोड येथील सिन्नर फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, मनोहर कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, उपाध्यक्ष सचिन पिंगळे, शहराध्यक्ष अंबादास खैरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, संदीप गुळवे, नंदन भास्करे, माजी नगरसेविका शोभा आवारे, माजी नगरसेवक हरीश भंडागे, जयप्रकाश गायकवाड, व्यापारी बॅंकेचे संचालक वसंत अरिंगळे, सुरेखा निमसे, सचिन टिळे, प्रशांत म्हस्के, दिगंबर म्हस्के, रामदास डुकरे, आसाराम शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की छगन भुजबळ पालकमंत्री असताना नाशिकचा विकास झाला, पण दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होऊनही आताच्या पालकमंत्र्यांना त्या कुटुंबांच्या घरी जाण्यासाठी वेळ नाही. एक नगरपालिका जिंकली आणि आता म्हणतात, बारामतीत येऊ. हा मग्रुरपणा आहे, अशी टीका त्यांनी केली. कांदा, दुधाला भाव मिळत नाही. केंद्र सरकारने पाचशे रुपये महिना मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. राफेल घाटोळा केल्याने अंबानी यांना पैसे मिळाले. तेच नाशिकच्या ‘एचएएल’ला दिले तर येथील दहा ते पंधरा हजार तरुणांना नोकरी मिळाली असती. गट-तट विसरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त खासदार, आमदार निवडून आणा. देशात व राज्यात सत्ता येईल असे काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

देवळाली मतदारसंघातील शिंदे, चांदगिरी, जाखोरी, कोटमगाव व सामनगाव आदी ठिकाणी शाखांचे उद्‌घाटन व चौकसभा घेण्यात आल्या. अमोल बागूल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तालुका पातळीवर निवडीचे पत्र पदाधिकाऱ्यांना रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

आयोजक निखिल भागवत यांनी प्रास्ताविक केले. अभिजित साबळे यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन देवळाली विधानसभा अध्यक्ष गणेश गायधनी, निखिल भागवत, राजाभाऊ जाधव, रोहित कटाळे, तुषार खाडंबहाले, वाल्मीक बागूल, रवींद्र धुर्जड, संदेश टिळे, योगेश चव्हाण, चेतन जाधव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com