'भाजपच्या बारशाच्या घुगऱ्या जेवलोय'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

नाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्‍त्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरीची आरती होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर श्रीमती गोऱ्हे यांनी सोमवारी (ता. ७) श्री काळारामाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोऱ्हे यांनी भाजपच्या युतीबाबतच्या दुटप्पी भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. जमलेल्या शिवसैनिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर बाद में सरकार’ अशा घोषणा देत, काळाराम मंदिर परिसरात शक्तिप्रदर्शन केले. काळामंदिर देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार झाला.

कडव्या हिंदुत्वाचे दुखणे
युतीची चर्चा झाली हे भाजपकडून एकतर्फीच सांगितले जात आहे. जनतेचा विकास आणि श्रद्धा ही शिवसेनेची कडवी हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. जे हनुमानाची जात शोधतात त्यांना काय बोलायचं, एका बाजूला युतीबाबत सकारात्मकता दाखवायची आणि दुसरीकडे अहंकार व मदमस्तपणा दाखवायचा, हे शिवसेना खपवून घेणार नाही. तीन राज्यांत पराभव म्हणजे अर्धे पानिपत ते आधीच हरले आहेत.

हे वागणे बरे नाही...
साहित्य संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आधी आमंत्रण द्यायचे, त्यानंतर नकार कळवायचा हे चुकीचेच आहे. तसेच त्या काय बोलणार, हे आधी मागून घेणे चुकीचे आहे. केवळ राजकीय दबावातून सहगल यांना नाकारलं गेले हे घडल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Neelam Gorhe Talking Politics Shivsena BJP