त्र्यंबकेश्‍वराच्या चरणी नवीन नोटांचेच दान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

दोन्ही दानपेट्यांतून मिळाली 51 लाखांची रक्कम
त्र्यंबकेश्‍वर - श्री त्र्यंबकेश्‍वराच्या दानपेटीतील रकमेच्या करण्यात आलेल्या मोजदादीत 51 लाखांचे दान जमा झाल्याचे आढळले. हजार-पाचशे नोटाबदलाचा दानपेटीवर परिणाम नाही. भाविकांनी त्र्यंबकराजाला नवीन नोटांचेच दान दिले.

दोन दानपेट्यांपैकी लहान पेटीत साधारण एक्केचाळीस लाख, तर मोठ्या पेटीत दहा लाखांच्या आसपास रक्कम मिळाली. यात हजार-पाचशे रुपयांच्या नोटा अजिबात मोठ्या प्रमाणात आढळल्या नाहीत. दानपेटीचे सील काढून त्या कोटी हॉलमध्ये बॅंकेचे कर्मचारी उपस्थितीत राहून पैसे मोजून बॅंकेत भरणा करतात. परंतु 8 नोव्हेंबरपासून हजार-पाचशेच्या जुन्या नोटांच्या बंदीमुळे बॅंकेतील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असल्याने देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दानपेटीतील रक्कम मोजण्यास मदत केली. या वेळी सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग करण्यात आले. देवस्थानचे विश्‍वस्त उपस्थित होते. मोजलेली रक्कम स्टेट बॅंकेच्या त्र्यंबकेश्‍वर शाखेत जमा करण्यात आली. पेडदर्शनासाठी हजार-पाचशेची नोट स्वीकारत नसल्याने त्या रकमा येण्याचा प्रश्‍नच नसल्याचा खुलासा व्यवस्थापक राजाभाऊ जोशी यांनी केला. दानपेटीत याचपटीत रक्कम जमते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: new currency donate in trambakeshwar donate box

टॅग्स