'खासदारकी'च्या वाटेवरील नवोन्मेषाची 'संपदा'

अमोल भट
शुक्रवार, 24 मे 2019

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या प्रवासात त्यांना भक्कम साथ लाभली ती सुविद्य पत्नी सौ.संपदा उन्मेष पाटील यांची.

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या प्रवासात त्यांना भक्कम साथ लाभली ती सुविद्य पत्नी सौ.संपदा उन्मेष पाटील यांची.

संपदा यांचे मूळगाव अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे माहेरी कुठलाही राजकीय वारसा नाही. 2005 मध्ये उन्मेष पाटीलांशी त्यांचा विवाह झाला. सासरी आल्यानंतर वातावरणात बदल झाला. सासरे भैय्यासाहेब पाटील यांना सरपंच पदाचाअनुभव व सामाजिक क्षेत्रातील वातावरणामुळे तसेच पती उन्मेष पाटील यांच्या  मार्गदर्शनामुळे सौ. संपदा पाटील यांचा नेतृत्व गुण विकसित झाला. पतीच्या समाजकारणारचा वारसा समर्थ सांभाळत असताना २००७ मध्ये उमंग समाज शिल्पी मंडळाची स्थापना करून साधारण दहा हजार महिला भगिनींची एक समृद्ध चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून महिला भगिनींच्या क्षमता विकासाला प्राधान्य देणारे,व्यक्तिमत्व विकासाला प्रेरित करणारे,नेतृत्व गुणास समृद्ध करणारे  तसेच पर्यावरण समृद्धी,संगणक साक्षरता आदी विषयीचे विधायक उपक्रम  राबविण्यात आले.

या जोडलेल्या साधारण दहा हजारांहुन अधिक परिवाराच्या माध्यमातून सामाजिक,सांस्कृतिक,आरोग्य आदी क्षेत्रातील कार्यक्रमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला संपूर्ण वाटचालीत उत्तम महिला संघटन उभे करत खऱ्या अर्थाने सौ संपदा यांनी होम मिनिस्टर ची भूमिका बजावली.
2014 चा संपूर्ण कार्यकाळ आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असे सौ संपदा पाटील आवर्जून सांगतात.

घरातील तसेच समाजात वावरत असताना समारंभ ,उत्सव,आदी प्रसंगात हजेरी लावून आमंत्रण देणाऱ्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्या सहभागी होत असतात यामुळे सामान्य कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांच्या मनात आपुलकीचे घर पक्के केले  2014  च्या विधानसभा निवडणुकीत उन्मेष पाटलांच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला होता.आता लोकसभा खासदार झाल्याने त्यांच्या मागे पत्नी संपदा पाटील यांचे मोठे यश आहे. 

कुटुंबात रमणारे खासदार 

कुटुंबात मुलगी सृष्टी,मुलगा समर्थ,स्वामी यांना आपल्या व्यस्त व्यापातून वेळ देताना त्यांच्या आवडीनिवडीं विषयी बाबांकडून काळजी घेण्यात येते सृष्टीला वाचनाची विशेष आवड त्यामुळे आपल्या दौऱ्यातुन परत आल्यानंतर तिला 'सृष्टी बेटा तुझ्यासाठी तूझा आवडता खाऊ आणला आहे' असे  खा.पाटील आवर्जून सांगताना पुस्तके भेट म्हणून देतात तसेच तिच्यात बुद्धिबळ सुद्धा खेळतात 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत खा.उन्मेष पाटील यांचे "हि लढाई कुठल्याही जातीपातीशी आणि पक्षाशी नाही तर वाईट प्रवृत्तीला गाडण्यासाठी आहे" एक वाक्य सभा तसेच भाषण आदींच्या माध्यमातून प्रभावी ठरले "हे वाक्य स्वामी आणि समर्थ आजही तोंडपाठ  तसेच आवेशपूर्ण हाव भाव प्रकट करत म्हणतात हि एक कौटुंबिक गोड आठवण म्हणावी लागेल
मुलगा समर्थ सोबत बॅडमिंटन तर स्वामी सोबत फ़ुटबाँल खेळताना त्यांच्या आवडता खिलाडूगुण जागृत होतो आणि बालगोपाळांत रमतात सौ संपदा पाटील याना पर्यावरणाची विशेष आवड असल्याने विविधप्रदर्शने,पर्यावरण पूरक उपक्रम नियोजनात  खा.पाटील यांचे  मौलीक मार्गदर्शन त्यांना लाभते. 

पत्नी ही आपली सर्वात जवळची विश्वासू मित्र असते, असे एका सुभाषितात देखील म्हटले आहे हे सुभाषित या दाम्पत्याला सार्थ ठरते. विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।.व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥.
अर्थ : प्रवासात तुम्ही शिकलेली विद्या मित्र असते. संसारात पत्नी तुमची मित्र असते. आजारात औषध मित्र असते आणि मृत्यूनंतर तुम्ही निभावलेला माणुसकी धर्मच मित्र उरतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New MP Unmesh Patil have big support of his wife Sampada Patil