पैठणीच्या कारागिराच्या आयुष्याला वर्तमानपत्र व्यवसायाने दिली उभारी

पैठणीच्या कारागिराच्या आयुष्याला वर्तमानपत्र व्यवसायाने दिली उभारी

येवला - १९८१-८२ मध्ये पैठणी व्यवसाय ठप्प झाल्याने पैठणीचा कारागिर अडचणीत सापडला होता..अशाच एका कारागिराला त्यावेळी वर्तमानपत्रपत्रांनी पुन्हा उभे राहण्यासाठी विश्वास ठेऊन आधार दिला अन वर्तमानपत्र विक्रीच्या व्यवसायाने हे कुटुंब पुन्हा उभे केले. नव्हे तर दैनिक सकाळने गेले ३५ वर्ष या कुटुंबावर आभाळभर मायेची उब देत उभारीसाठी बळ भरले आहे.

येवल्यात वर्तमानपत्र म्हटलं की सर्वात पुढे नाव येते ते स्व.मोहन वडे यांचे..खरे तर वडे हे पैठणी कारागीर मात्र १९८१ च्या दरम्यान येथील पैठणी व्यवसायाला बाजारपेठेत उतरती कळा लागली होती. अशा अडचणीच्या काळात वडे यांनी स्वीकारला वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय.सर्व दैनिकासह विविध मासिके विक्री करतानाच १९८५ पासून ते पुणा आवृत्तीचा सकाळ येथे विक्री करू लागले.पुढे १९८९ मध्ये सकाळची नाशिक आवृत्ती सुरू झाल्यानंतर तर वडे व सकाळ असे समीकरणच तयार झाले.येथे सकाळला वलय मिळवून देत तेव्हापासून तर आजपर्यंत टॉपवर ठेवण्यात वडे कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे,म्हणूनच एवढ्या वर्षांत सकाळने येथे एकच वितरकावर विश्वास ठेवला आहे.

पुढे २००० मध्ये वडे यांच्यावर बायपास शस्रक्रिया कऱण्याची वेळ आली. आर्थिक अडचणीतील वडे कुटुंबीयांमागे त्यावेळी सकाळने भक्कमपणे पाठीशी उभे राहून आधार दिला.या संकटातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा वडे यांनी वृत्तपत्र विक्रीतील घोडदौड चालूच ठेवली. मुले लहान असल्याने याच व्यवसायावर त्यांनी २००७ मध्ये एका मुलीचे देखील दिमाखात लग्न केलं.

मात्र २००९ मध्ये काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि हे कुटुंब पुन्हा उघडयावर आले. त्यावेळी मोठा मुलगा सागर २४ वर्ष, अमोल २१ वर्षे व आनंद १७ वर्षे वयाचे होते. आनंद तर शिक्षणच घेत होता परंतु वडिलांच्या जाण्याने या मुलांनी वयाचा विचार न करता हा व्यवसाय अंगाखांद्यावर घेऊन पुन्हा त्याला झळाळी दिली.आई हेमलता स्व.मोहन वडे यांना या व्यवसायात हातभार लावत होत्या, त्याच अनुभवातून त्यांनी या तीन मुलांना नेहमीच प्रेरणा दिली. आज या तिघांचेही विवाह झाले असून सागरने तर पैठणी व्यवसायात पाऊल ठेऊन कलामंदिर पैठणी नावाचे शोरूम सुरू केले आहे. छोटा आनंद बँकेत नोकरी करतो मात्र आई हेमलता व सागरच्या मार्गदर्शनाखाली अमोल आणि आनंद या दोघा भावंडांनी वर्तमानपत्राला मुख्य व्यवसाय मानून कुटुंबाची प्रगती अव्याहतपणे पुढे चालविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com