Sand
sakal
न्याहळोद: येथील पांझरा नदीपात्रात अवैधपणे रेती वाहतूक सुरू असून, १२ ते १३ वाहनांच्या माध्यमातून बिनदिक्कतपणे रेतीचा उपसा सुरू असल्याने महसूल विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. न्याहळोद परिसरातील कौठळ रस्त्यालगत, तसेच जापी रस्ता परिसरातून दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक होत आहे. परिणामी, लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.