निजामपूर-जैताणेत भुजबळ समर्थकांचा जल्लोष

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 4 मे 2018

माजी मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे येथील भुजबळ समर्थकांनी खुडाणे चौफुलीवर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे येथील भुजबळ समर्थकांनी खुडाणे चौफुलीवर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व टीडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा. संदीप बेडसे, माजी कृषी सभापती सचिन बेडसे, माजी उपसभापती प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे, अमित नागरे, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, सतीश बाविस्कर, एकनाथ माळी, किशोर बागुल, संजय सूर्यवंशी, अल्ताफ कुरेशी आदींसह भुजबळ समर्थक उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

Web Title: Nijampur Jaitane crowd supporters of Bhujbal