गिरणा धरणात नव्वद टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन  ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होवून आजचा पाणीसाठा ९०% पंर्यत पोहचला आहे.

 

वेहेळगाव : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन  ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होवून आजचा पाणीसाठा ९०% पंर्यत पोहचला अाहे.

 गिरणा धरणात गेल्या दोन ते तीन वर्षानंतर पुन्हा एकदा चांगला जलसाठा झाल्याने गिरणा पट्ट्यातील वेहेळगाव, मळगाव नरडाना, बोराळे, अामोदे व गिरणा पट्ट्यातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाली असून धरणातून एवढ्या साठ्यावर किमान चार आवर्तने तरी मिळू शकतात त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून बारगळलेला रब्बी हंगाम यावर्षी पुर्ण होणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील गावात बरोबर जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात असणाऱ्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याबरोबर जलसिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही १००% सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या गिरणा पट्टा यंदा हिरवाईने  बहरण्यास मदत होणार आहे.

गिरणा धरणाची एकूण क्षमता 21500 दशलक्ष घनफूट एवढी आहे सध्या स्थितीला धरणात19 हजार 383 दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे त्यापैकी 16 हजार 383 दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे म्हणजेच 90 टक्के एवढा पाणीसाठा आहे गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही काही प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाण्याच्या धीम्या गतीने का होईना आवक सुरू आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे त्या धरण क्षेत्रातील धरणे भरल्याने पाणी आल्यावर त्यातून विसर्ग सुरु होतो त्यामुळे गिरणा धरण 100 टक्के भरण्याची चित्र आहेत २००६ नंतर पहिल्यांदाच गिरणा धरण शंभरी गाठेल असा अंदाज आहे. दमदार पाणीसाठा असल्याने धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते.

गिरणा धरणात यावर्षी 100% टक्के पाणीसाठा होणार आहे त्यामुळे धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी किमान तीन ते चार आवर्तने सोडण्यात येतील त्याचा सर्वाधिक फायदा आम्हा शेतकऱ्यांना मिळणार असून रब्बी हंगामासाठी त्याचा मोठा फायदा होईल.

गिरणा धरणात आत्तापर्यंत 90 टक्के एवढा पाणीसाठा झाल्याने गिरणा पट्ट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली  निघाला आहे गेल्या वर्षी धरणात 48 टक्के एवढाच पाणीसाठा होता त्यामुळे गेल्या वर्षी पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात बसली होती यंदा मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीप्रश्न सुटला आहे त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण अाहे.- हेमंत .व्ही. पाटील उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव

गिरणा धरण 90%टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे .तरी गिरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .कारण कोणते प्रकारचे वित्त व प्राणहानी होणार नाही असे आदेश तलाठी ग्रामसेवक पोलिस पाटील सरपंच यांना कळविले आहे.- जगदिश भाबङ, शेतकरी बोराळे शिवार तालुका नांदगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ninety percent water storage in the girna dam