निफाड - लोकन्यायालयाच्या तारखेत बदल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

निफाड - राज्यात सर्वत्र न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय शनिवार दि १४ एप्रिल २०१८ रोजी आयोजित करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्याने राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या तारखेत बदल करण्यात आला असुन, सदरचे राष्ट्रीय लोकन्यायालय रविवार दि‌ २२ एप्रिल २०१८ रोजी होणार आहे

जी प्रकरणे, दावे, अर्ज हे १४ एप्रिल २०१८ रोजीच्या लोकन्यायालयात नेमलेली होती, त्या सर्व प्रकरणातील संबंधित पक्षकारांनी २२ एप्रिल २०१८ रोजीच्या राष्ट्रीय लोकन्यायालयात हजर रहावे असे राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई उच्च न्यायालय यांचेकडील पत्र MSLSA/2018/680  तारिख 26-3-2018 अन्वये कळविण्यात आले आहे. याची नोंद घ्यावी आसे तालुका विधी व सेवा समिती निफाड यांनी कळविले आहे

Web Title: niphad loknyayalay dates change