निफाडच्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीसाठी संपाचा नारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

निफाड - कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा तातडीने कर्जमुक्त करावा, या प्रमुख मागणीसाठी निफाड तालुक्‍यातील शेतकरी 1 जूनला बेमुदत संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय निफाड किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाने पुकारलेल्या संपाचे लोण आता नाशिक जिल्ह्यातही पसरण्यास सुरवात झाली असून, जिल्ह्यातील बैठकीची सुरवात निफाड तालुक्‍यातून होत आहे. या वेळी केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीसंदर्भात कोणतेही पाऊले उचलत नाही. सोने पिकवणाऱ्या बळिराजावरच उपासमारीची वेळ आल्याने लोकशाहीतील अखेरचा मार्ग संप असल्याने असंघटित शेतकरी संघटित होऊन 1 जूनपासून शेतमाल विकणार नाही आणि खरेदीही करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

Web Title: niphad strike for farmer loanfree