पेरलेलं रान सारं, ऊन जाळीत चाललं, नक्षत्राच्या पावसानं गाव नेमकं टाळलं!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

येवला : पेरलेलं रान सार,ऊन जाळीत चाललं... नक्षत्राच्या पावसानं गाव नेमकं टाळलं... चांदवड येथील कवी विष्णू थोरे यांच्या या पंक्तीची आठवण गावोगावी येतेय.तालुक्यात निमित्तमात्र झालेल्या यंदाच्या पावसाने पेरणीचा खेळ केला आहे.अल्पशः पाण्यावर ४५ हजार १८३ टक्के क्षेत्रावर (८३ टक्के) पेरणी झाली आहे,यातील सुमारे २५ हजार हेक्टरवरील पिकांचे जमिनीतून कोंब उगवत असतांनाच पाऊस गायब झाला असून उगवणारे कोंब ढेकळातच गुदमरत आहेत.आता ऊन पडल्याने ‘टेन्शन’ वाढले आहे.    

यंदा पावसाचे रोहिणी पाठोपाठ हक्काचे मृग नक्षत्रदेखील घात करणारे ठरत असून जुलै सुरु झाला पण मात्र अद्याप जोरदार पावसाचे आगमन झालेले नाही.अद्यापही बंध्रारे,विहिरी,कुपनलिका कोरड्याठाक आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने हवालदिल असले तरी हंगाम पुढे लोटू नये म्हणून शेतकरी पेरणीचा जुगार करत आहेत.तालुक्यात पेरणीचे आकडे पहिल्या एक-दोन पावसावर ८३ टक्यावर पोहोचले आहेत. पेरणी झालेले मका,कपाशीचे कोंब उगवत तास धरू लागले अन पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके मरणासन्न अवस्थेत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांवर पावसाचे ढग नव्हे तर संकटांचे "ढग‘जमत आहेत.

शेतकऱ्यांनी तालुक्यात ज्वारी,बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मुग, उडीद, भूईमुग, सुर्यफुल, तीळ, सोयाबीन, कपाशी, ऊस अशा खरीप पिकाची पेरणी केली आहे.यामध्ये सर्वातजास्त मका,सोयाबीन,कपाशी पिकाचा पेरा आहे.पावसाअभावी पिके सुकत चालली असून शेतकरी ढगाकडे पाहून वरूण राजाला पावसासाठी साकडे घालत आहे.झालेल्या पेरणीचा अंदाज घेतल्यास शेतकरी मका व कांद्याकडे वळला आहे.मका अन् बाजरीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.तालुक्यात मका ३३ हजार, कापूस १२ हजार, बाजरी ९ हजार हेक्टर तर सोयाबीन ३ हजार ५०० हेक्टर व इतर पिके मिळून ६७ हजार ९२४ हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. यापैकी ४५ हजार १८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून संपूर्ण पीक हातातून जाणार या जाणिवेने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे,असे शेतकरी सिंचनाव्दारे पिकांना पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.काहींनी तर बादलीने पाणी देणे सुरु केले आहे.

अशी झाली पेरणी..
पिक --- प्रस्तावित क्षेत्र -- आजपर्यत झालेली पेरणी
बाजरी ---   ९३२५ --- ५४०८
मका ---   ३३६७० --- २१८०१
तूर ---   १६५७ --- ८९७
मूग -- ३७०१ --- ३६१९
उडीद --- ८९० --- ५४९
भुईमुग --- ३२५० --- १५६४
सोयाबीन --- ३५१४ --- २६८८
कापूस  --- ११८९७ --- ८६३९
ऊस  ---   २० ---  ०००
एकूण -- ६७९२४ --- ४५,१८३

Web Title: no rain and sowing process is complete