Dhule News : 5 महिन्यांपासून पगार नाही; धुळे Civilच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Civilian contract employees agitating for various demands.

Dhule News : 5 महिन्यांपासून पगार नाही; धुळे Civilच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

धुळे : येथील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, कर्मचाऱ्यांना समाधानकारक मानधन द्यावे, कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत दीर्घकाळाचा करार करण्यात यावा, अशा मागण्या मांडत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २) निदर्शने केली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढेल, असा इशारा देण्यात आला. (No salary for 5 months Agitation of Dhule Civil contract employees Dhule News)

जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गाच्या काळापासून ५० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. एमव्हीजी या कंपनीच्या माध्यमातून दोन वर्षांपासून तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीच्या जागेवर ५० कर्मचारी नियुक्त आहेत. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.

मात्र, रुग्णालयाच्या आस्थापनांवर असलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. एमव्हीजी कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दरमहा १५ हजार रुपये मिळविले आहेत. त्याच वेळी कर्मचाऱ्यांना मात्र केवळ आठ हजार रुपये देण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिन्यांनंतर एकदा मानधन दिले जाते.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Dhule Crime News : साखरपुड्यासाठी गेलेल्या सानेंकडे चोरट्यांचा डल्ला!

त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. महिन्याच्या अखेरच्या दिवशी काही कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देऊन त्यांचे काम बंद केले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत दीर्घकाळाचा करार करावा. सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वेतन द्यावे, अशा मागण्या असल्याचे छाया बैसाणे आणि मुकेश पाटील यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना नीलेश भामरे, राहुल नवसारे, सिद्धार्थ खरे, ललित शिरसाठ, वैभव चौधरी, देवेंद्र धात्रक, जयवंत गोरे, छोटू गायकवाड, वैभव चौधरी, भावेर अहिरराव, रूपेश गोरे, अमोल जाधव, संदीप जोगी, निशिगंधा सोनवणे, कविता शिरसाट, जयश्री धात्रक, ऊर्मिला सोनार, संध्या कोळी, शोभा शिरसाट आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Jindal Fire Accident : जिंदालची आग विझवण्यासाठी NMCची 12 अग्निशमन वाहने आली कामी!