Jindal Fire Accident : जिंदालची आग विझवण्यासाठी NMCची 12 अग्निशमन वाहने आली कामी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jindal Fire Accident

Jindal Fire Accident : जिंदालची आग विझवण्यासाठी NMCची 12 अग्निशमन वाहने आली कामी!

नाशिक : गोंदे एमआयडीसी मधील जिंदाल कंपनीला लागलेली आग नियंत्रणात असली तरी अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्यापही आग विझविण्याचे काम सुरू आहे दरम्यान आग विझवण्यासाठी दोन दिवसात तब्बल २२ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले यात नाशिक महापालिकेंचे बारा बंबांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. (Jindal Fire Accident 12 fire engines of NMC helped to extinguish Jindal fire nashik news)

वर्षाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे एक जानेवारीला जिंदाल कंपनी स्पोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. आगेची तीव्रता इतकी भयानक होती की इगतपुरी भिवंडी परिसरा पर्यंत धुराचे लोट दिसत होते.

खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली तर विमानांचे मार्ग देखील बदलण्यात आले. राज्य शासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टर द्वारे पाणी फवारण्याची तयारी दाखवली.

'हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : आम्ही थांबावं का जावं...?

दुसऱ्या दिवशीही घटनास्थळावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. पहिल्या दिवशी आग लागल्यानंतर महापालिकेचे आठ बंब दाखल झाले त्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी चार असे एकूण बारा अग्निशामन वाहने आग नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झाले.

त्या व्यतिरिक्त भिवंडी महापालिकेचा एक इगतपुरी सिन्नर पिंपळगाव बसवंत व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे प्रत्येकी एक त्याचप्रमाणे आर्मीचे दोन औद्योगिक विकास महामंडळाचा एक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व मायको कंपनीचा प्रत्येकी एक असे २२ बंब आग विझण्यासाठी दाखल झाले होते. आज आटोक्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी खबरदारी म्हणून नाशिक महापालिकेचे चार बंब घटनास्थळी तैनात होते.

हेही वाचा: Dhule Crime News : साखरपुड्यासाठी गेलेल्या सानेंकडे चोरट्यांचा डल्ला!