जळगाव : गिरणा धरणातून पाणी सोडलेले नाही : पाटबंधारे विभाग

सुधाकर पाटील
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

 गिरणा धरणातून सद्यपरिस्थितीत पाणी सोडण्यात आलेले नाही. शोसल मिडीयावर पाणी सोडल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे.

भडगाव  : गिरणा धरणातून सद्यपरिस्थितीत पाणी सोडण्यात आलेले नाही. शोसल मिडीयावर पाणी सोडल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यांच्यावर नागरीकांनी वीश्वास ठेवू नये असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली. धरणात सध्या 93 टक्के एवढा पाणीसाठा आहे.

दरम्यान, कालपासून सोशल मिडीयावर गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे.  गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले. अशा पोस्ट टाकून त्यासोबत धरणाचे जुने फोटो टाकण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असून संभ्रम निर्माण होत आहे. त्यापाश्वभुमिवर उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी सांगितले की, गिरणा धरणात सध्या 93% पाणीसाठा आहे.

पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार गिरणा धरणात 15 सप्टेंबर पूर्वी 96 टक्के पाणीसाठा झाला तरच पाणी सोडण्यात येते. व 15 सप्टेंबर नंतर 100 शंभर पाणीसाठा असेल तरच पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते. परंतु सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही.  त्यामुळे अद्याप तरी धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही असेही पाटील यांनी सांगितले. धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. येत्या काळात पाणीसाठा वाढल्यामुळे पाणी सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तसे अधिकृत कळविण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये हेमंत पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No water discharge from girana Dam : irregation department