'लढाऊ विमाननिर्मितीचा प्रकल्प नाशिकला देणार '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

नाशिक  - ओझरच्या एचएएल कारखान्यात सुखोई-30 विमानाच्या निर्मितीचे काम दोन वर्षे पुरेल एवढे असेल. त्यानंतर 50 टक्के एवढे विमानांच्या दुरुस्तीसाठीच्या पूर्ण तपासणीचे (ओव्हर हाउल) काम शिल्लक राहणार आहे. त्यामुळे हे काम सद्यःस्थितीत वर्षाला 12 विमानांचे असून, ते वर्षाला 30 विमानांपर्यंत वाढविण्यात येईल. तसेच धोरणात्मक भागीदारीतून लढाऊ विमान, हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प नाशिकला दिला जाईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे सांगितले. 

सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. भामरे म्हणाले, की कोणत्याही देशाची आत्मनिर्भरता सुरक्षेबाबत असते. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा, बौद्धिकता आणि संशोधन व विकासच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हे सामर्थ्य "एचएएल'सारख्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे. आता त्याचा विकास करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मेक इन इंडिया'च्या माध्यमातून देशात उत्पादनावर भर दिला आहे. देशातील संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक अथवा खासगी उद्योगासमवेत उभारणी करायची आहे. त्यातून संरक्षणासाठी लागणाऱ्या परकीय चलनाची बचत होण्याबरोबर रोजगारवृद्धीला हातभार लागणार आहे.'' 

सीमेवर भारतीय सैन्य प्रबळ 
सीमेवर भारतीय सैन्य प्रबळ आहे. त्यामुळे शत्रूंनी आगळीक केल्यास त्यांना दसपटीने प्रत्युत्तर दिले जाते. मात्र पाकिस्तानच्या पिछाडीची माहिती तेथील जनतेला मिळत नाही. आपले सैन्यदल जगात सर्वोत्कृष्ट आणि सक्षम आहे. काश्‍मीरच्या खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची मोहीम लष्करातर्फे राबवण्यात येत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांप्रमाणेच पाकिस्तानमध्ये नैराश्‍याची भावना तयार झाली आहे.'' 

डोकलाममध्ये शांतता 
""डोकलामबाबत भारताचा मोठा विजय झाला आहे. देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे कर्तव्य असल्याने त्यादृष्टीने भारताने पावले उचलली होती. अखेर ते चीनला मान्य करावे लागले. सद्यःस्थितीत डोकलाममध्ये शांतता आहे,'' असेही डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

Web Title: north maharashtra subhash bhamre