केरळला 60 लाखांच्या नोटा रवाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

विमानाने नोटा रवाना
येथील मुद्रणालयातून आज त्रिवेंद्रमला (केरळ) पाचशे, शंभर आणि वीस रुपयांच्या 60 लाखांच्या नोटा रवाना झाल्याचे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले. ते म्हणाले, की चलननिर्मितीपासून नोटा पाठविण्यापर्यंतची सर्व कामे कामगारांनी विनामोबदला केली.

नाशिक- चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांनी राष्ट्रीय गरज ओळखून साप्ताहिक सुटी असूनही मोफत नोट छपाईचे काम केले. पाचशे, शंभर, वीस रुपयांच्या 60 लाखांच्या नोटा विमानाने केरळला पाठविल्या. नोट छपाईपासून, तर नोटांचे कन्साईन, ओझर विमानतळावरून पाठविण्यापर्यंत सगळी कामे आज मोफत केली.

देशात पाचशे व हजाराच्या नोटा बाद केल्याने टंचाईची स्थिती आहे. अशा स्थितीत वाढीव नोटांची गरज भागविण्यासाठी सुटीच्या दिवशी छपाई सुरू राहावी, म्हणून चलार्थपत्र मुद्रणालयाने आज प्रेस कामगारांना मोफत कामाचे आवाहन केले होते. मुद्रणालय प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो कामगारांनी मोफत चलन छपाईचे काम केले.

चौथ्यांदा योगदान
आतापर्यंत भारत - चीन युद्ध, बांगलादेशची फाळणीच्या वेळी अशाच प्रकारे योगदान दिले. रात्री दहापर्यंत छपाईसह विविध मुद्रणाची कामे केली. भारताचे शेजारी नेपाळला अत्यावश्‍यक स्थितीत प्लॅस्टिक कोट नोटांची छपाईची गरज होती. त्या वेळीही योगदान दिले आहे. सध्या चलनटंचाईवर मात करण्यासाठी मतभेद विसरून कामगारांनी विनामोबदला जादा काम करून चौथ्यांदा योगदान दिले.

विमानाने नोटा रवाना
येथील मुद्रणालयातून आज त्रिवेंद्रमला (केरळ) पाचशे, शंभर आणि वीस रुपयांच्या 60 लाखांच्या नोटा रवाना झाल्याचे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले. ते म्हणाले, की चलननिर्मितीपासून नोटा पाठविण्यापर्यंतची सर्व कामे कामगारांनी विनामोबदला केली.

Web Title: notes worth 60 lac rupees sent to kerala