...आता वाद पुरे, विकासकामे करू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

जळगाव - आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

जळगाव - आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

बारामतीत जाऊन निवडणूक लढविण्याचे सूतोवाच मंत्री महाजन यांनी केले होते. त्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाजन बारामतीत याच, दाखवतो तुम्हाला..!’ असे आव्हान दिले; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाजन आता निवडून येऊन दाखवाच, असे आव्हान जामनेरमध्ये निर्धार परिवर्तनांतर्गत झालेल्या जाहीर सभेत दिले होते. त्याबाबत मंत्री महाजन यांच्याशी जामनेरमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारले असता महाजन म्हणाले, की वादाचे विषय अजिबात नको, राज्यातील विकासाची कामे करावयाची आहेत. त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.

पाणी आरक्षण, चारा छावण्या 
राज्यात पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासन उपयोजन करीत आहे, असे मत व्यक्त करून महाजन म्हणाले, की राज्यात गेल्या वर्षी धरणात आजच्या स्थितीत ५९ टक्के साठा होता, मात्र आज केवळ ४१ टक्के साठा आहे. 

मराठवाडा क्षेत्रातील धरणात केवळ १३ टक्के साठा आहे, तर नागपूरला २२ टक्के साठा आहे. त्यामुळे आहेत त्या स्थितीत पाण्याचा विनियोग कसा  करण्यात येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई निवारणासाठी धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येईल. महसूल विभागातर्फे तर टंचाईग्रस्त गावात पाणी टॅंकर व चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. 

‘बलून’साठी दोन दिवसांत बैठक
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवर सात बलून बंधारे मंजूर केलेले आहेत. त्यासाठी निधी आवश्‍यक आहे. त्याबाबत महाजन म्हणाले, की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत निधीसाठी येत्या दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यांच्याकडून निधी प्राप्त करून येत्या  पंधरा दिवसांत बलून बंधाऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल.

Web Title: Now the debate is enough do development works says girish mahajan