Nandurbar News : विविध दाखल्यांसाठी लाभार्थ्यांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

talathi office lock

Nandurbar News : विविध दाखल्यांसाठी लाभार्थ्यांची गैरसोय

विसरवाडी (जि. नंदुरबार) : तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय दुपारपासूनच कार्यालयाला कुलूप लावले जात आहे. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात असल्याचे कारण सांगितले जाते. उर्वरित शेतकरी (Farmer), विद्यार्थी, लाभार्थी यांचे विविध दाखल्यांसाठी मात्र गैरसोय होत आहे. (office of Talathi Mandal Adhikari is being locked beneficiaries were inconvenienced for various certificates nandurbar news)

विसरवाडी (ता. नवापूर) मंडळांतर्गत सात गावांचे सज्जे जोडलेले आहेत. त्यात विसरवाडी, बंधारपाडा, भरडू, खानापूर, कडवान, खडकी, वडफळी या गावांचा समावेश असून, त्यांना इतर गावेदेखील जोडली गेली आहेत.

त्या त्या गावातील शेतकरी, विद्यार्थी व वैयक्तिक लाभासाठी लाभार्थी शेतकरी विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी जातात, मात्र दुपारून दोनपासूनच तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप लावलेले असते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग व शैक्षणिक या विविध योजना प्रकरणे दाखल्यांसाठी लाभार्थी, विद्यार्थी, शेतकऱ्यांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. संबंधित विभागाने दखल घेऊन लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी शेतकरी, विद्यार्थी, वैयक्तिक लाभार्थी, ग्रामस्थांनी केली आहे.