चोसाकात दीड लाख टन ऊस गाळपाचा संकल्प - नीता पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

चोपडा - उसाचे प्रमाण यावर्षी 50 टक्के आहे. ऊस पळविण्यासाठी शेजारील कारखाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. यास कोणीही बळी पडू नका. कारखाना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी दीड लाख टन ऊस गाळप करण्याचा संकल्प आहे. अशी माहिती चोपडा साखर कारखान्याच्या अध्यक्षा नीता पाटील यांनी दिली. 

चोपडा - उसाचे प्रमाण यावर्षी 50 टक्के आहे. ऊस पळविण्यासाठी शेजारील कारखाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. यास कोणीही बळी पडू नका. कारखाना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी दीड लाख टन ऊस गाळप करण्याचा संकल्प आहे. अशी माहिती चोपडा साखर कारखान्याच्या अध्यक्षा नीता पाटील यांनी दिली. 

चहार्डी (ता. चोपडा) येथील साखर कारखान्याच्या आज 23व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी त्या बोलत होत्या. बुधगावचे शेतकरी भूषण पाटील व त्यांच्या पत्नी कोमल पाटील, गरताडचे शेतकरी विश्‍वनाथ पाटील व त्यांच्या पत्नी उषाबाई पाटील यांच्याहस्ते बॉयलर प्रदीपन झाले. यावेळी माजी आमदार कैलास पाटील, बाजार समितीचे संचालक भरत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी पाटील, संचालक प्रवीण गुजराथी, जितेंद्र पाटील, सुनील महाजन, भरत पाटील, गोपाळ पाटील, अतुल ठाकरे, गोपाळ महाजन, भरत जाधव, रवींद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, देवेंद्र सोनवणे, तुकाराम पाटील, शेतकरी कृती समितीचे संजय पाटील, कार्यकारी संचालक अरविंद निकम, नीलेश पाटील, सुरेश पाटील, डॉ. पांडुरंग सोनवणे आदी उपस्थित होते. 

श्रीमती पाटील पुढे म्हणाल्या, की आपला ऊस आपल्याच कारखान्यात द्यावा. आपल्या कारखान्याचा सोन्याचा धूर निघणे बंद झाले आहे. कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी ऊस उत्पादकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, की कारखाना अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. तालुक्‍यातून भरपूर ऊस बाहेर गेला. यंदा मात्र शेतकऱ्यांनी कारखान्यातच ऊस द्यावा. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखाना वाचविण्यासाठी ऊस आपल्याच कारखान्यात द्यावा असे आवाहन केले. अरविंद निकम यांनी प्रास्ताविक केले. सचिव आधार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक भरत पाटील यांनी आभार मानले. 

Web Title: One and a half million tons of sugarcane crushing will in Cosakata