चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दीड वर्षाच्या मुलाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा गुन्हा पोलिसांना दाखल करावा लागला. गुरुवारी जळगाव बुद्रुक येथील ज्योती थोरे या विवाहितेचा खूनप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कासारी येथील घटनेत पोलिसांनी मयत विवाहितेचा पती ज्ञानेश्‍वर काशिनाथ काळे याला ताब्यात घेतले असून, अन्य दोघांना सायंकाळी उशीरापर्यंत ताब्यात घेण्याचे काम सुरु होते.

नांदगाव: एकवीस वर्षीय विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेत तिच्या गळ्याला फास लावून खून केल्यावर तिच्या दीड वर्षाच्या मुलाला विष पाजून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील कासारी येथे आज शुक्रवारी (ता.४) घडली. सुवर्णा ज्ञानेश्‍वर काळे व दीड वर्षाचा स्वरुप अशी या प्रकरणातील मयत मायलेकांची नावे आहेत. 

सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा गुन्हा पोलिसांना दाखल करावा लागला. गुरुवारी जळगाव बुद्रुक येथील ज्योती थोरे या विवाहितेचा खूनप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कासारी येथील घटनेत पोलिसांनी मयत विवाहितेचा पती ज्ञानेश्‍वर काशिनाथ काळे याला ताब्यात घेतले असून, अन्य दोघांना सायंकाळी उशीरापर्यंत ताब्यात घेण्याचे काम सुरु होते.

कासारी येथील ज्ञानेश्वर काशिनाथ काळे याचा मनमाड येथील चिंतामण कृष्ण देवरे यांची मुलगी सुवर्णा हिच्यासोबत झालेला होता विवाह झाल्यापासून ज्ञानेश्वर सुवर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून मानसिक छळ करीत असे शिवाय दीड वर्षाचा स्वरुप हा मुलगा आपल्या पोटचा नाही असे म्हणत तो सुवर्णाला छळत होता, अशी फिर्याद सुवर्णाचे वडील चिंतामण यांनी पोलिसांत दिली 

गुरुवारी रात्री कासारी शिवारात राहत्या घरी सुरवातीला सुवर्णाचा गळफास लावून त्याने खून केला व त्यांनतर लहानग्या स्वरूपाला विष पाजले या घटनेत दोघा मायलेकांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात सकाळी या मायलेकांचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी कासारी गावात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: One and half year old son murdered with their mother