
शहादा : शेतातून साहित्य चोरी; एक ताब्यात
शहादा : पिंगाणे (ता. शहादा) शिवारातून काही शेतकऱ्यांच्या शेतातून ४८ हजार ७०० रुपयांच्या ठिबक नळ्या व पीव्हीसी पाइप चोरून नेले असून, शहादा पोलिस ठाण्यात राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून संशयित रियाज भिकन पिंजारी (रा. भाजीपीर दर्ग्याजवळ, कुकडेल शहादा) याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेत शिवारात सध्या खरिपाची लगबग सुरू असून, केळी, पपई व कापूस पिकाची लागवड करण्यासाठी बागायतदार शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यात भारनियमन व कूपनलिकेला पाणी कमी असल्याकारणाने बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी शेत शिवारात सध्या ठिबक सिंचनाच्या नळ्या व टाकण्याचे काम सुरू आहे. यात चोरट्यांनी संधी साधत पिंगाणे (ता.शहादा) येथील युवराज राजाराम पाटील, राजेंद्र बन्सी पाटील, राधाबाई बन्सी पाटील यांसह इतरही शेतकऱ्यांचा शेतातून ठिंबक सिंचनाचा नळ्या व पीव्हीसी पाइप चोरट्यांनी चोरुन नेले. चोरट्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा: एकलहरे शिवारातून विद्युत साहित्य चोरीला
हेही वाचा: जळगाव : लाचखोर मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात
Web Title: One Arrested For Stealing Materials From Agriculture News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..