बस-कारची सामोरासमोर धडक; कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू

बस-कारची सामोरासमोर धडक; कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू

एरंडोल : धुळ्याकडून भरधाव वेगाने जाणारी बस व जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी व आई गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर एरंडोल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धारागीर गावाजवळील हॉटेल साईनाथ जवळ झाला. अपघातग्रस्त कुटुंबीय शिवबाबा परिवारातील असुन ते सर्व जण माउंटाबु येथे धार्मिक कार्यासाठी जात असल्याचे समजते.

याबाबत माहिती अशी, की आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावारी धारागीर गावाजवळ असलेल्या हॉटेल साईनाथ जवळ धुळे येथुन भरधाव वेगाने जाणारी धुळे जळगाव बायपास बस (क्रमांक एम.एच.१४ बी.टी.२०४२) व धुळ्याकडे जाणारी मारुती एसक्रास (क्रमांक एम.एच.२० इ.वाय.२८६३) ची समोरासमोर जोरदार धडक झाली.या अपघातात कारमधील मालेगाव जिल्हा नासिक येथे कार्यरत असलेले सार्वजनिक बांकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता दिलीप सोपानराव घाडगे वय ५६ रा.५६ कृष्णाई,लक्ष्मी नगर,इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गारखेडा परिसर औरंगाबाद यांचा जागीच मृत्यु झाला तर त्यांच्या पत्नी व आई गंभीर जखमी झाल्या. कार चालक यास अपघातामुळे मोठा मानसिक धक्का बसला असुन तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. अपघातात मयत घाडगे परिवार शिव बाबा परीपाराचे असुन ते माउंटाबु येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते.अपघात इतका भयंकर होता कि बस व कारचे मोठे नुकसान झाले.कारची एक बाजू पुर्णपणे दाबली गेली होती.तसेच कारचे चालक बाजू कडील मागचे टायर फुटले होते.अपघात झाल्यानंतर धारागीर येथील पोलिस पाटील दिलीप पाटील, ईश्वर पाटील, संजय पाटील,राकेश पाटील मनसेचे माजी शहर प्रमुख प्रा.सुहास महाजन व ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमीना बाहेर काढण्यासाठी मदत केली.अपघातानंतर बस चालक फरार झाला असुन बसमधील अन्य प्रवाशाना दुस-या बसने जळगाव येथे रवाना करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com