नाशिकजवळ वऱ्हाडाच्या टॅम्पोला अपघात; मुलाचा मृत्यू

nashik
nashik

नांदगाव : हातगाव येथील वऱ्हाड नाशिक येथून लग्नावरून परतत असताना नांदगाव - वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्यानजीक वऱ्हाडाचा टॅम्पो पलटी झाल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव सनी भाऊसाहेब आव्हाड (वय १०) असे आहे. तर या अपघातात वऱ्हाडातील ४० ते ४५ जण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे लग्न होते. लग्न आटोपल्यांतर वऱ्हाडी घराकडे परतत असताना नांदगाव - वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्यानजीक वऱ्हाडाचा टॅम्पो पलटी झाल्याने झालेल्या अपघातात सनी हा मुलगा ठार झाला.

अपघात घडल्यानंतर लगेचच स्थानिक रुग्णवाहिकेद्वारे जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहण बोरसे यांचेसह शहरातील सर्वच डॉक्टरांनी रुग्णांना प्रथमोपचार केले. शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांची देखील मोठी मदत यावेळी अपघातग्रस्तांना झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com