सातपूरला विचित्र अपघातात कंटेनरचालक ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील सातपूर-शिवाजीनगर रस्त्यावर आज सकाळी विचित्र अपघातामध्ये कंटेनरचालकाचा बळी गेला. कंटेनर सुरू ठेवून पत्ता विचारण्यासाठी गेलेला चालक परतेपर्यंत कंटेनर धावू लागला आणि तो रोखण्यासाठी कंटेनरमध्ये चढण्याच्या प्रयत्नात चालकच चाकाखाली सापडून ठार झाला. तर नंतर कंटेनरने तीन दुचाकी आणि एका टपरीला धडक देत नुकसान केले. सुदैवानेत यात मोठी जीवितहानी टळली असली तरी दोघे-तिघे जखमी झाले. परंतु यात कंटेनरचालकाचा मात्र बळी गेला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास एक कंटेनर आला. शिवाजीनगर-सातपूर रस्त्यावरील बॉश कंपनीनजीक रस्त्यालगत कंटेनरचालकाने कंटेनर थांबविला. परंतु, त्याने कंटेनर बंद न करता, कदाचित हॅण्डब्रेक लावून खाली उतरला आणि पत्ता विचारण्यासाठी रस्त्यापलिकडील टपरीवाल्याकडे गेला. त्याचवेळी कंटेनर अचानक पाठीमागे उतार असल्याने धावू लागला. सदरची बाब लक्षात येताच कंटेनरचालकाने कंटेनरकडे धाव घेतली आणि तो रोखण्यासाठी कंटेनरच्या चालक केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच कंटेनरच्या चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला. तर कंटेनरने पाठीमागे तीन दुचाक्‍यांना चुराडा करीत रस्त्यालगतच्या टपरीला धडकला. यात दोन दुचाकीस्वार थोडक्‍यात बचावले तर टपरीचालक महिलाही वाचली. याप्रकरणी पोलीस माहिती घेत असून मृत कंटेनर चालकाचे नाव समजू शकलेले नाही.

Web Title: one dies in an accident in satpur