Latest Marathi News | बिजासनी घाटात अपघातात एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातग्रस्त कंटेनर

Dhule News : बिजासनी घाटात अपघातात एक ठार

शिरपूर : भरधाव कंटेनरने ट्रकच्या मागील भागाला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात चालक ठार झाला. हा अपघात गुरुवारी (ता.२९) रात्री दोन ते तीनच्या दरम्यान महामार्गावर बिजासनी घाटात घडला. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.(One killed in accident at Bijasani Ghat dhule latest news)

बिजासनी देवी मंदिरासमोर महामार्गावर उतार असलेल्या जागी हा अपघात घडला. दोन्ही वाहने इंदूरकडून मुंबईकडे निघाली होती. रात्री दोनच्या सुमारास कंटेनर (एमपी ०९ एचजी ४९१०) वरील चालकाचे नियंत्रण सुटले.

उतारावरुन भरधाव वेगाने खाली येत कंटेनरने पुढे चालणाऱ्या ट्रक (एमपी ०९ एचजे ६६६०) ला मागील बाजूने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बिजासनी पोलिस चौकीचे प्रभारी सुरेश पाटीदार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. केबिन तोडून कंटेनरचालकाला बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा: Dhule Crime News : शिरपूर- इंदूर बसमधून 5 पिस्तुले जप्त

त्याच्या खिशातील ओळखपत्रावरुन मृत मोहंमद अशफाक मन्सूर शाह (वय ६२) असून, ते बदनावर (जि.धार, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. अपघातामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली. पोलिसांनी पहाटेपर्यंत दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

हेही वाचा: Rain Update News : गरब्याच्या उत्साहावर कडकडाटासह परतीची मुसळधार!