धुळ्यात भाजप मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर कांदा फेक आंदोलन

निखिल सूर्यवंशी
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

धुळेः कांदा रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यालयाबाहेर कांदा फेकून आज (शुक्रवार) आंदोलन केले.

धुळेः कांदा रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यालयाबाहेर कांदा फेकून आज (शुक्रवार) आंदोलन केले.

राज ठाकरे काल नाशिक दौऱयावर होते. कांद्याच्या घसरलेल्या दराबाबात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, कांदा उत्पादक शेतकरी एवढी मेहनत करुन पदरी निराशा पडत असेल, सरकार तुम्हाला आश्वासन देण्यास तयार नसेल तर कांदा रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा. इतकं सरळसोपं आहे. जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा. इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे. मग तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा. शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याला मारा. मंत्र्यांना कांदा फेकून मारण्याचे माझे वक्तव्य एवढे पसरलं की ते सरकारपर्यंत पोहोचले. सरकारने आता कांद्याला 200 रुपयांचा दर जाहीर केला आहे. मात्र, कांद्याला दिलेल्या 200 रुपये प्रति क्विंटल अनुदानावर मी समाधानी नाही,"

ठाकरे यांच्या क्तव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. पारोळा रस्त्यावर असलेल्या भामरे यांच्या कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा फेकून आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हंशराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली साहेबरावकाका मोरे, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, नितीन रोठे पाटील, शरद लभडे, मनोज भारती, सचिन कड, प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब तासकर, काशीनाथ बागदरे, प्रशांत पाटील, मंगेश बावस्कर, रामदास गवळी, हिरामन पुंढे, भूषण मासुळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: onion thorw Movement outside the BJP Ministers office in Dhule