भडगाव पालिकेचा कारभार झाला ऑनलाईन

सुधाकर पाटील
गुरुवार, 3 मे 2018

सभांचे ठराव ही दिसणार 
या वेबसाईटवर पालिकेच्या सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभाचे ठरावही सर्वसामान्य जनतेला पाहता येणार आहे. विशेष म्हणजे 2015 पासुनच्या अशा सर्वसाभाचे ठराव  येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. काढण्यात आलेल्या निविदा, मंजुर निविदाची माहीती मिळु शकणार आहे.  

भडगाव : भडगाव पालिकेचा सर्व कारभार आता घरबसल्या एका क्लिकवर पाहता येणार आहे. आठवडा भराचे घंटागाडीच्या नियोजनापासुन ते या आठवड्यात गटार कोणत्या भागात काढण्यात आली, ट्रिप लाईट कुठे बसविण्यात आले. सर्व सभाचे  ईतिवृत्त, वार्षिक अंदाजपत्रक याशिवाय बरंच काही आता वेबसाईटवर सहज बघता येणार आहे . असे करणारी भडगाव  जिल्ह्यात एकमेव पालिका ठरली आहे. 

सध्या सर्वत्र डीजीटल व ऑनलाईनचा बोलबाला आहे.  शासनानेही त्यावर मोठ्याप्रमाणात भर दिला आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरूप आपण ही बदल पाहीजे असे भडगाव पालिकेने विशेषतः मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी ठरविले. आता सर्व कारभार त्यांनी जनतेसाठि खुला करून पारदर्शक हातभाराच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले आहे. 

एका क्लिकवर दिसणार कारभार 
पालिकेने पालिकेचा सर्व माहीती ही वेबसाईटवर शहरवासीयांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यात शहराच्या संदर्भातील सर्व माहीतीसह पालिकांच्या माध्यमाने शहरात सुरू असलेल्या कामांची माहीती सहज पाहता येणार आहे. याशिवाय वार्षिक अंदाजपत्रक, वार्षिक लेखे, पालिकेचा विकास आराखडा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध कामाचे अंदाजपत्रके, त्या कामाची सद्य:स्थिती हे ही बघता येणार आहे. www.bhadgaonmahaulb.maharashtra.gov.in ही ती वेबसाईट आहे.

आठवड्याचे केलेले कामेही दिसणार 
कामाचे अंदाजपत्रक तर दिसेलच पण याशिवाय आठवडाभरात कोणत्या भागात गटारी काढण्यात आल्या. ट्रीट लाईट कुठे लावण्यात आले ते ही नागरीकांना आपल्या मोबाईलवरून बघता येईल. याशिवाय लवकरच आठवड्याचे पाण्याचे , घंटागाडीचे व फवारणीचे नियोजन यात अपडेट करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व नगरसेवकाचे प्रभाग निहाय नाव व मोबाईल नंबर ही उपलब्ध आहेत. तर कोणत्या विभागाला कोण कर्मचारी कार्यरत आहे हे ही या वेबसाईटवर दिसते. त्यामुळे नागरीकांना आता कोणालाही काहीही विचारायची गरज नाही. त्यांनी वेबसाईट उघडल्यावर हे सर्व सहज पाहणे शक्य होणार आहे.  

सभांचे ठराव ही दिसणार 
या वेबसाईटवर पालिकेच्या सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभाचे ठरावही सर्वसामान्य जनतेला पाहता येणार आहे. विशेष म्हणजे 2015 पासुनच्या अशा सर्वसाभाचे ठराव  येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. काढण्यात आलेल्या निविदा, मंजुर निविदाची माहीती मिळु शकणार आहे.  

जिल्ह्यातील एकमेव पालिका 
पालिकेचा सर्व कारभार हा वेबसाईटच्या माध्यमाने लोकांसाठी खुला केल्याने  पारदर्शकेच्या दृष्टीने भडगाव नगरपालिकेने एक पाऊल टाकले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात असे करणारी भडगाव ही एकमेव पालिका आहे. आगामी पंधरा दिवसात ही वेबसाईट परीपुर्णरित्या अपडेट करण्यात येणार आहे. या सर्व बाबी उघड केल्याने घरबसल्या पालिकेचा कारभार सर्वसामान्यांना एका क्लिकवर पाहता येणार आहे. इतर पालिकांनी वार्षिक अंदाजपत्रका व्यतिरिक्त फारसे काही अद्याप या वेबसाईटवर टाकले नाही. 

पालिकेचा कारभार सर्वसामान्य जनतेला कळण्यासाठी वेबसाईटवर सर्व माहीती टाकण्यात आली आहे.  शहरवासीयांनी या वेबसाईटवरवर    पालिकाचे कामकाज पहावे.
- राहूल पाटील मुख्याधिकारी भडगाव 

आपला पहील्यापासुन पारदर्शक कारभाराला प्राधान्य आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार कोणीही अगदि झोपडीतल्या माणसाकडे मोबाईल व नेट असेल तो ही पाहू शकतो. आम्ही हे करू शकलो हे मोठे समाधान आहे. 
- राजेंद्र पाटील नगरध्यक्ष भडगाव

Web Title: online work in Bhadgaon municipal