मुक्त विद्यापीठाची 27 मेस पूर्वतयारी ऑनलाइन परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नाशिक - येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी शिक्षणक्रमाची ऑनलाइन परीक्षा रविवारी (ता. 27) दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याआधी पूर्वतयारी शिक्षणक्रमाची ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. ऑनलाइन परीक्षा महाराष्ट्र ज्ञान विकास महामंडळाच्या (एमकेसीएल) विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी व उर्दू माध्यमातून ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील "होमपेज'वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील सर्व विभागीय केंद्रे, अभ्यास केंद्रे व परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी म्हटले आहे.
Web Title: open university Preliminary online exam