वैद्यकीय प्रवेशाच्या अर्जासाठी उद्यापर्यंत संधी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांना बुधवार (ता. 26)पर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येतील.

नाशिक -  एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांना बुधवार (ता. 26)पर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येतील. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल. 

राज्य सामूहिक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत प्रक्रिया राबविली जाते आहे. एमबीबीएस, दंत शाखेतील बीडीएस, आयुर्वेद शाखेतील बीएएमएस, होमिओपॅथीचे बीएचएमएस, युनानीचे बीयूएमएस यांसह फिजिओथेरपी, बी. एस्सी. (परिचारिका) या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेशप्रक्रिया आहे. महासीईटीच्या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येईल. प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज भरून निर्धारित शुल्क भरल्यानंतरच संबंधितांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाईल. ऑनलाइन अर्ज दाखल करताना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम निवडीसाठी प्रेफरन्स फॉर्म भरण्याची मुदत एमबीबीएस व बीडीएससाठी 29 जून ते 4 जुलैपर्यंत असेल, तर अन्य अभ्यासक्रमांसाठी 5 ते 11 जुलैदरम्यान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for medical admission application tomorrow