Dhule News : लव्ह जिहादला विराट मोर्चातून विरोध!; जनआक्रोशातून धर्मांतरालाही हरकत

Virat Morcha on Agra Road.
Virat Morcha on Agra Road.esakal

धुळे : देशासह राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणविरोधी कायदा लागू करण्यात यावा. तसेच गोवंशहत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे रविवारी (ता. १८) विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मार्चेकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. यात महिला, तरुण व तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. (Opposition to Love Jihad from Virat Morcha Objection to conversion due to public outcry Dhule News)

शहरात लव्ह जिहाद, धर्मांतराला विरोधाबाबत मागण्यांचे निवेदन रविवारी भारतीय प्रशासकीय सेवेचे परिवीक्षाधीन अधिकारी सत्यम गांधी यांना देताना हिंदू जनआक्रोश मोर्चाचे शिष्टमंडळ.
शहरात लव्ह जिहाद, धर्मांतराला विरोधाबाबत मागण्यांचे निवेदन रविवारी भारतीय प्रशासकीय सेवेचे परिवीक्षाधीन अधिकारी सत्यम गांधी यांना देताना हिंदू जनआक्रोश मोर्चाचे शिष्टमंडळ.esakal

शहरातील मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सकाळी अकराला मोर्चास सुरवात झाली. आग्रा रोडमार्गे फुलवाला चौक, महाराणा प्रताप स्मारक, झाशीची राणी स्मारक व तेथून महापालिकेमार्गे क्युमाइन क्लबजवळ मोर्चाचा समारोप झाला. या ठिकाणी मोर्चाचे नेतृत्व करणारे सुरेश चव्हाणके, श्‍यामजी महाराज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाप्रमुख संजय शर्मा आदींची भाषणे झाली.

मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या. विविध मागण्यांचे फलक झळकवत मोर्चेकरी भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले. जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय भवानी-जय शिवराय अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणला.

शिष्टमंडळाचे निवेदन

मोर्चेकरी शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन दिले. पाच मोर्चकऱ्यांच्या शिष्टमंडळाने येथील भारतीय प्रशासकीय सेवेचे परिवीक्षाधीन अधिकारी सत्यम गांधी यांना चारपानी विविध मागण्यांचे निवेदन दिले. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा शहराचे उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी उपस्थित होते. मोर्चासाठी अडीचशेवर अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता.

मोर्चा शांततेत पार पडला. खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सभापती शीतल नवले, विजय पाच्छापूरकर, डॉ. विपुल बाफना, डॉ. माधुरी बोरसे, अल्फा अग्रवाल, प्रतिभा चौधरी, राजेश पवार, भगवान गवळी, शशी मोगलाईकर, प्रवीण अग्रवाल, शिवसेनेच्या शिंदे गटाचे मनोज मोरे, सतीश महाले, पंकज धात्रक, तसेच राजेंद्र खंडेलवाल, प्रवीण मंडलिक, योगेश देशमुख, डॉ. सचिन चिंगरे, डॉ. योगेश पाटील आदी सहभागी झाले.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Virat Morcha on Agra Road.
Gram panchayat Election : येवला तालुक्यात शेती कामातून वेळ काढत मतदार राजा मतदानासाठी केंद्रावर!

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

हिंदू तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारने तत्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा देशात वा राज्यात आणावा. कोणत्याही महिलांविषयी घडलेल्या लैंगिक अत्याचार, हत्येच्या सर्वच प्रकरणात जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी व खटला पूर्ण होईपर्यंत आरोपीस जामीन मिळू नये. आरोपी दोषी ठरल्यावर राज्यकर्त्यांनी शिवछत्रतींचा आदर्श गिरवून तत्काळ त्याचे हातपाय कलम करावे.

धर्मांध आफताबचा त्याच्यासारख्या प्रत्येक लव्ह जिहादीचा हातपाय कलम करावा. लव्ह जिहादचा मुख्य उद्देश हिंदू तरुणींचे धर्मांतर असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा. लव्ह जिहादविषयी प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष पोलिसांची शाखा स्थापन व्हावी. लव्ह जिहादसाठी प्रोत्साहित करणाऱ्यांवर तत्काळ बंदी घालावी. लव्ह जिहाद व धर्मांतरासाठी देशाबाहेरून अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था, दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.

हिंदू धर्मातून मुस्लिम व ख्रिचन धर्मात धर्मांतरित झालेल्या सर्वांचे आरक्षण व सवलती रद्द कराव्यात. गोहत्या व त्यातून निर्माण होणारा प्रचंड काळा पैसा लव्ह जिहादसाठी प्रामुख्याने वापरला जातो म्हणून गोवंशहत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. राज्यात सर्वच कत्तलखाने बंद करण्यात यावेत. छत्रपती शिवरायांचे सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करावेत.

Virat Morcha on Agra Road.
Gram Panchayat Election : प्रतिष्ठेच्या लढतीत पिंपळगावला 72 टक्के मतदान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com