पात्रता परीक्षेला अभियोग्यता चाचणीचे मलम

Oral-Test
Oral-Test

नाशिक - ‘सीईटी’नंतरही शिक्षकभरती होत नसल्याची ओरड होत असल्याचे लक्षात घेऊन नवीन चाचणी घेण्याचा २०१७ मध्ये शिक्षण विभागाने निर्णय घेतला. त्यास अभियोग्यता चाचणी (TET व TAIT) असे नाव दिले.

राज्यभरातील ६७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, तिच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. या प्रश्‍नांवर खुलासा करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. 

२०१३ पासून चालढकल करणाऱ्या सरकारच्या शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या गोंडस नावाखाली २०१७ मध्ये राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकभरती करण्यासाठी गेल्या वर्षी १२ ते २१ डिसेंबरदरम्यान अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली. या परीक्षेकरिता राज्यातील तब्बल एक लाख ९७ हजार ५२० जणांनी अर्ज केले. त्यांच्यापैकी एक लाख ७१ हजार ३४८ जणांनी ही परीक्षा दिली. परीक्षेसाठी ई-महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण संगणकीय प्रणालीच्या आधारे राज्यातील ६७ केंद्रांवर दररोज तीन याप्रमाणे एकूण ३० बॅचेसमध्ये ऑनलाइन चाचणी घेण्यात आली. परीक्षार्थींना त्यांचा निकाल परीक्षा झाल्यावर समजला. त्यानंतर शिक्षण विभागाने हा निकाल जानेवारीत ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. मात्र, त्यावर परीक्षार्थींनी आक्षेप नोंदविले. त्यात पेपरच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले, प्रत्येक विद्यार्थ्याला विषयानुसार भारांक याचे प्रमाण विषम, तर काठीण्य पातळी समान राखली गेली. आकृत्या स्कॅन केलेल्या होत्या, ज्याचा फाँट खूप लहान होता इत्यादींसह अन्यही आक्षेप नोंदविले. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सर्व आक्षेपांच्या पडताळणीनंतर तब्बल तीन महिन्यांनी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

कशासाठी होती परीक्षा
अभियोग्यता चाचणी दिलेले गुणवत्ताधारक उमेदवार राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतील, असा निकष देण्यात आला होता.

काय लागला होता निकाल?
    २०० गुणांच्या अभियोग्यता चाचणीमध्ये १६१ ते १८० 
गुण मिळविणाऱ्या गटात अवघे तीन उमेदवार
    १४१ ते १६० गुण मिळविणाऱ्यांच्या गटात ८५० उमेदवार
    १२१ ते १४० गुण मिळविणाऱ्यांच्या गटात ११ हजार १५४ उमेदवार
    १०१ ते १२० गुण मिळविणाऱ्यांच्या गटात ३७ हजार ८७७ उमेदवार
    ८१ ते १०० गुण मिळविणाऱ्यांच्या गटात सर्वाधिक ६२ हजार ९८२ उमेदवार
    ६१ ते ८० गुण मिळविणाऱ्यांच्या गटात ४७ हजार १२४ उमेदवार
    मराठी माध्यम एकूण उमेदवार : एक लाख ७८ हजार ७५१
    इंग्रजी माध्यम : दहा हजार ९९२
    ऊर्दू माध्यम : सात हजार ७७७

राज्य सरकारने सीईटी, टीईटी आणि टीएआयटीनंतर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरती करण्याचा निर्णय घेतला; पण प्रत्येक वेळी पवित्र पोर्टल आणि शिक्षकभरतीसाठी तारीख पे तारीख आणि आश्‍वासने दिली जात आहेत. 
- तुकाराम गिरी, डीएड, बीएड विद्यार्थी, हिंगोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com